Breaking News

छातीत दुखू लागल्याने विजयपत सिंघानिया रूग्णालयात

मुंबई, दि. 18, ऑगस्ट - रेमंडचे संस्थापक डॉ. विजयपत सिंघानिया यांना छातीत दुखू लागल्याने गुरूवारी ब्रीच कँडी रुग्णालयात रूग्णालयात दाखल करण्यात  आले. सिंघानिया यांना साडेसहाच्या सुमारास रूग्णालयात दाखल करण्यात आले. डॉ हेमंत ठाकर यांनी सिंघानिया यांची तपासणी केली असून तातडीने रूग्णालयात  दाखल होण्याचा सल्लाही दिला होता. पुढील 48 तास सिंघानिया यांना देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे. सिंघानिया यांना उच्च रक्तदाब असून त्यांच्या प्रकृतीत  सुधारणा होत असल्याची माहिती ठाकर यांनी दिली. लंडनमध्ये मार्चमध्ये सिंघानिया यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती.