Breaking News

माझ्यासह ऑस्ट्रेलियात कोहलीचे अनेक चाहते - माइकल क्लार्क

मुंबई, दि. 18, ऑगस्ट - ऑस्ट्रेलियातील प्रसार माध्यमे विराट कोहलीबद्दल नेहमी टीका करत असले तरी माझ्यासह त्याचे ऑस्ट्रेलियात असंख्य चाहते असल्याचं ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकेल क्लार्क याने म्हटलं आहे.
कोहली हा जबरदस्त खेळाडू आहे. तो सर्वोत्तम दर्जाचं क्रिकेट खेळतो. तो मैदानावर आक्रमक दिसतो, पण तो मैदानाबाहेर तो चांगला माणूस आहे. मैदानावरची आक्रमकता हा एक खेळाचा भाग आहे. त्याच्या बद्दल अनेकांच्या मनात आदर आहे. असं ही तो बोलला. ऑस्ट्रेलिया आता भारताचा दौर्‍यावर येणार आहे. ’भारताला भारतात पराभूत करणं कठिण आहे. सध्याचा भारतीय संघाचा आत्मविश्‍वास वाढलेला आहे. ऑस्ट्रेलियासाठी हा दौरा आव्हानात्मक असेल. असं देखील क्लार्कने म्हटलं.