0
नवी दिल्ली, दि. 18, ऑगस्ट - माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्याप्रकरणी जैन आयोगाच्या अहवालाच्या आधारे पुढील तपास करण्याबाबतच्या याचिकेवर  सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) तपासाच्या तपशीलाबाबत स्पष्टीकरण मागितले आहे. राजीव गांधी यांच्या हत्येबाबतचा फेरचौकशीतून काय  हाती लागले आहे, हत्येसाठी वापरलेला बॉम्ब कोणी तयार केला होता, असे सवाल न्यायालयाने केले. याप्रकरणी 23 ऑगस्टपर्यंत याबाबत स्पष्टीकरण देण्याचे आदेश  केंद्रीय अन्वेषण विभागाला दिले आहेत.
या प्रकरणाचा पुढील तपास किती कालावधीत पूर्ण होईल? फरार आरोपिंच्या प्रत्यार्पणाच्या प्रक्रियेतील कायदेशीर अडथळे कोणते? त्यासाठी अन्वेषण विभागाने  कोणती पावले उचलली असेही न्यायालयाने विचारले आहे. याप्रकरणी ए.जी. पेरारीवलनच्या याचिकेवर सुनावणी सुरू आहे. मागील सुनावणीदरम्यान न्यायालयाने जैन  आयोगाच्या निर्देशानुसार पुढील तपास होणे आवश्यक असल्याचे केंद्रीय अन्वेषण विभागाला सांगितले होते. केंद्रीय अन्वेषण विभागाने तपासाचा अहवाल चार  आठवड्यात सीलबंद स्वरूपात न्यायालयासमोर सादर करावा, असेही न्यायालयाने यावेळी सांगितले होते.

Post a Comment

 
Top