Breaking News

सिनसिनाटी ओपन : सानिया-शुआई जोडीचा उपांत्य फेरीत प्रवेश

सिनसिनाटी, दि. 18, ऑगस्ट - सिनसिनाटी खुल्या टेनिस स्पर्धेत महिला दुहेरीच्या गटात चतुर्थ मानांकित भारताच्या सानिया मिर्झा आणि तिची चीनी जोडीदार पेंग  शुआई या जोडीने स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. या जोडीने रोमानियाच्या एरीना-कॅमेलिया बेगु आणि रॅलुका ओलारू या जोडीचा 6-3, 6-7(1-7), 10-3  असा पराभव केला. पहिला सेट सानिया-शुआई जोडीने सहजपणे जिंकला. पण दुस-या सेटमध्ये रोमानियाच्या जोडीने चांगलीच टक्कर दिली. हा सेट टायब्रेकरपर्यंत  चालला. टायब्रेकरमध्ये रोमानियाच्या जोडीने सानिया-शुआई जोडीला तब्बल 6 गुणांच्या फरकाने पराभूत केले आणि सामन्यात बरोबरी साधली. पण तीच लय  तिस-या सेटमध्ये रोमानियाच्या जोडीला कायम राखता आली नाही आणि तो सेट त्यांना 10-3 असा गमवावा लागला.