Breaking News

सिनसिनाटी ओपन : बोपण्णा-डॉडीग जोडीचे आव्हान संपुष्टात

सिनसिनाटी, दि. 19, ऑगस्ट - सिनसिनाटी खुल्या टेनिस स्पर्धेत सातव्या मानांकित भारताच्या रोहन बोपण्णा आणि क्रोएशियाच्या इवॅन डॉडीग जोडीचे स्पर्धेतील  आव्हान उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आले. द्वितीय मानांकित ब्राझीलचा मार्सेलो मेलो आणि पोलंडचा लुकाझ कुबोट या जोडीने बोपण्णा-डॉडीग जोडीचा 1-6,  7-6(7-5), 10-7 असा पराभव केला. झंझावाती खेळ करत बोपण्णा-डॉडीग जोडीने पहिला सेट जिंकला. दुसरा सेट अटीतटीचा झाला. टायब्रेकरमध्ये  मेलो-कुबोट जोडीने सेट जिंकला. तिस-या सेटमध्येही बोपण्णा-डॉडीग जोडीने ‘काँटे की टक्कर’ दिली, पण मेलो-कुबोट जोडी वरचढ ठरली.