0
नवी दिल्ली, दि. 19, ऑगस्ट - ‘मॉस्किटो टर्मिनेटर’ रेल्वे आज नवी दिल्लीहून रवाना झाली. रेल्वे व्यवस्थापक आर. एन. सिंग यांनी आज सकाळी रेल्वेला हिरवा  झेंडा दाखविला. या रेल्वेद्वारे डासांची उत्पत्ती वाढू नये म्हणून औषध फवारणी केली जाते. ही रेल्वे दोन दिवसांमध्ये 100 किलोमीटर अंतर पार करते. प्रत्येक  फेरीदरम्यान एका आठवड्याचे अंतर ठेवले जाते. या रेल्वेची पहिली फेरी 18 आणि 19 ऑगस्ट रोजी, दुसरी फेरी 25 आणि 26 ऑगस्ट रोजी, तिसरी फेरी 8  आणि 9 सप्टेंबर रोजी तर चौथी फेरी 15 आणि 16 सप्टेंबर रोजी होणार आहे. ही रेल्वे रोहिल्ला, पटेल नगर, दिल्ली छावनी, पालम, दिल्ली सफदरजंग, दिल्ली  किशनगंज, लाजपत नगर, हजरत निजामुद्दीन, आदर्श नगर, राठधना, दिल्ली शाहदरा आणि गुडगांव स्थानकांहून जाणार आहे. 

Post a Comment

 
Top