0
बार्सिलोना, दि. 19, ऑगस्ट - स्पेनमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील तीन संशयितांची नावे पोलिसांनी जाहीर केली आहेत. मुसा कबीर (17), सईद आला  (18) और मोहम्मद हयकामी (24) असे या संशयितांची नावे असल्याचे कातालोनिया पोलिसांनी सांगितले. तर चौथा संशयित युनस अबू याकूब याचा शोध सुरु  आहे. 
स्पेनमधील बार्सिलोना आणि कॅम्ब्रिल्स येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 14 जण ठार तर 100 जण जखमी झाले होते. या हल्ल्यात 12 दहशतवाद्यांचा समावेश  असल्याची शक्यता पोलीस जोसेफ लुईस यांनी वर्तविली आहे. हल्ल्यातील पाच दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले असून अन्य चार जणांना अटक करण्यात  आली आहे.

Post a Comment

 
Top