Breaking News

सत्ता कुणालाही दिली तरी माझ्याकडेच यावं लागेल: मुख्यमंत्री

मुंबई, दि. 18, ऑगस्ट - देशात आणि राज्यात भाजपची सत्ता आहे. त्यामुळं तुम्ही कुणालाही सत्ता दिली, तरी कामासाठी आमच्याकडेच यावं लागणार आहे, असं  म्हणत मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांनी मिरा भाईंदरच्या मतदारांना आवाहन केलं.
मुख्यमंत्री म्हणाले, काही लोक आम्ही हे करु, ते करु, अशी मोठ मोठी आश्‍वासनं देतात. मात्र तुम्ही ती पूर्ण कशी करणार? ना तुमची देशात सत्ता आहे, ना राज्यात.  राज्य तर आमचं आहे, देशात नरेंद्र मोदी आहेत, इथे मी आहे. जर तुम्हाला सत्ता दिली, तर कामांसाठी तुम्हाला माझ्याकडेच यावं लागेल. माझ्याकडे येऊन तुम्हाला  विनंती करावी लागेल. पण या दलालांची गरज काय, तुम्ही सरळ भाजपला सत्ता द्या,  महापौर अभिमानाने माझ्याकडे येतील. मी त्यांना सांगेन, तुम्ही  मिरा-भाईंदरपर्यंत पोहचेपर्यंत तुम्हाला विकासकामांसाठी पैसे मिळालेले असतील.