Breaking News

गणेशोत्सवाबाबतचा वाद म्हणजे मुर्खपणा - राज ठाकरे

पुणे, दि. 19, ऑगस्ट - पुण्यात सध्या सार्वजनिक गणेशोत्सव कुणी सूरु केला यावरून वाद सूरु आहेत. हा वाद म्हणजे मुर्ख पणा आहे. टिळक-रंगारी वाद म्हणजे  मूर्खपणा असून लोकमान्य टिळकांचं योगदान विसरता येणार नाही असे स्पष्ट मत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यात व्यक्त केले.
सध्या पुण्यात भाऊ रंगारी गणेश मंडळाचे विश्‍वस्तांनी सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक लोकमान्य टिळक नसून भाऊ रंगारी आहेत असा दावा केला आहे. त्या  पार्श्‍वभूमीवर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्‍नावर ते बोलत होते.पुणे महापालिकेच्या प्रभागनिहाय पदाधिकार्‍यांच्या नियुक्त्या करण्यासंदर्भात ते पुण्यात दाखल झाले असून  त्यासाठी प्रत्येक सदस्यांची मुलाखत घेऊन स्वत: ठाकरे या संदर्भातील नियुक्त्या करणार आहेत. सप्टेंबर महिन्यात मनसेचा पुण्यात मेळावा आयोजित करण्यात आला  असून त्यावेळी पक्षाची कार्यकारिणी जाहीर करणार असल्याचे ठाकरे म्हणाले. त्यावेळी सविस्तरपणे चर्चा करेन असे ते म्हणाले.