Breaking News

एकाच खिडकीतून मिळवा अमाप वाचन साहित्य, विद्यापीठ ग्रंथालयाचा उपक्रम

औरंगाबाद, दि. 19, ऑगस्ट - डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठेबसाइटवर उपलब्ध असलेले 45 हजार हून अधिक ई-नियतकालिके आणि तीस  लाखाहून अधिक ई-बुक्स तसेच विद्यापीठ ग्रंथालयात उपलब्ध असलेले तीन लाख एकोणऐंशी लाख वाचनसाहित्य एका सिंगल क्लिक वर ‘इब्स्को डिस्कव्हरी  सव्र्हिस‘ च्या माध्यमातून एक खिडकीतुन मिळविला येणार आहे.कुलगुरु डॉ.प्रोपेैसर डॉ.बी.ए.चोपडे यांच्या हस्ते शुक्रवारी (दि.18) या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात  आले. 
महात्मा पुले सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास कुलसचिव डॉ.प्रदीप जब्दे, ‘इब्स्को डेटाबेस‘चे विशाल वर्मा, प्रशिक्षक जी.के.उपाध्याय, कौस्तुभ मुखोपाध्याय,  संचालक डॉ.धर्मराज वीर यांची प्रमुख उपस्थिती होती. कुलगुरु डॉ.बी.ए.चोपडे म्हणाले, विद्यापीठ ग्रंथालयाच्या वेबसाइटवर 30 हून अधिक डेटाबेस असल्याचे नमूद  करुन विद्यापीठ ग्रंथालयातील ग्रंथाची उपलब्धता पाहण्यासाठी ओपॅक तसेच माहिती ऑनलाईन असो वा अथवा ऑनलाईन मोफत मिळणारी ओपन सोर्स असो किवा  ग्रंथालयातील उपलब्ध ग्रंथ संपदा ऑपलाईन असो अशी हि सर्व माहिती एक सिंगल क्लिकच्या माध्यामातून ‘इब्स्को डिस्कव्हरी सव्र्हिस‘च्या मदतीने विद्यार्थी,  संशोधक आणि प्राध्यापकांना एका खिडकीतून ऑनलाईन पाहता येईल. डॉ.धर्मराज वीर यांनी उपलब्ध असलेल निरनिराळया डेटाबेस आणि त्यामधील आशयाची  माहिती प्रास्ताविकात दिली. प्रशिक्षक जी.के.उपाध्याय यांनी डेटाबेस प्रशिक्षण दिले आणि असलेली माहिती कशा पध्दतीने डेटाबेसमधून शोधावी याचे तंत्र सांगितले.  डेटाबेसमधून उपलब्ध व प्राप्त माहितीचा इमेल कसा करावा, साईट कसे करावे, बुकमार्वै, परमॅलीक, एक्सपोर्ट कसे करावे आदी बाबीचे सखोल मार्गदर्शन प्रशिक्षणाच्या  माध्यमातून केले.250 संशोधकांनी कार्यक्रमास लाभ घेतला. सूत्रसंचालन चक्रधरी कोठी यांनी तर गजानन खिस्ते यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी गजानन खिस्ते,  सचिन गाडेकर, योगेश सुरवाडे, अविनाश आवटे, इरफान यांनी परिश्रम घेतले.