0
श्रीनगर, दि. 19, ऑगस्ट - दहशतवाद्यांना आर्थिक रसद पुरवल्याप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने काश्मीरी व्यावसायिक झाहूर अहमद शहा वटाली याला अटक केली.  वटाली याला अटक केली जाण्याची ही दुसरी वेळ आहे. 1990मध्ये त्याला देशविरोधी कारवाई केल्याबद्दल जम्मू-काश्मीर पोलिसांनी अटक केली होती. त्यावेळी  जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंटचा नेता यासीन मलिक, साजद लोन आणि त्यांचे बंधू बिलाल लोन यांनाही अटक केली होती, अशी माहिती तपास यंत्रणेच्या एका  अधिका-याकडून देण्यात आली आहे.
3 जून रोजी तपास यंत्रणेने वटालीच्या घरी छापा टाकत आर्थिक व्यवहार आणि जमीन व्यवहारांसंबंधीची कागदपत्रे जप्त केली होती.

Post a Comment

 
Top