Breaking News

पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात व्यंगचित्र काढणा-या आसामच्या व्यंगचित्रकाराला धमकी

नवी दिल्ली, दि. 19, ऑगस्ट - स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात व्यंगचित्र काढणारे आसाममधील व्यंगचित्रकार नितुपर्णा राजबंग्शी यांनी  जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी नितुपर्णा यांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. 
15 ऑगस्ट रोजी नितुपर्णा याने हे व्यंगचित्र सोशल मिडीयावर प्रसिद्ध केले होते. त्यानंतर त्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. नितुपर्णा याला देण्यात  धमकीमुळे त्याचे कुटुंबीय चिंतेत आहेत.त्यामुळे तक्रार दाखल दाखल केली असल्याचे त्याने सांगितले. या व्यंगचित्रात गोरखपुरमध्ये मृत्यू झालेल्या बालकांविषयी  संवेदना व्यक्त करण्यात आली होती. तर पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका करण्यात आली होती.