Breaking News

खासगी शाळांची मनमानी खपवून घेतली जाणार नाही - केजरीवाल

नवी दिल्ली, दि. 19, ऑगस्ट - ज्या खासगी शाळा नियमांचे उल्लंघन करत आहेत त्यांची मनमानी खपवून घेतली जाणार नाही. आम्ही खासगी शाळांच्या विरोधात  नाही. मात्र अशा शाळा पालकांकडून जादा शुल्क घेत असतील तर असतील तर असे प्रकार रोखले जातील , असे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज  सांगितले. ते आज येथे एका पत्रकार परिषदेदरम्यान ते बोलत होते.
ते म्हणाले की, आतापर्यंत सरकारी आणि खासगी असे दोन विभाग होते. खासगी शाळेत जास्त फी असल्यामुळे श्रीमंतांची मुले शिक्षण घेतात. तर सरकारी शाळेत फी  कमी असल्यामुळे गरीबांची मुले शिक्षण घेतात. मात्र आता आम्ही यामधील अंतर कमी केले असून आम्ही सरकारी शाळेतील शिक्षणावर भर देत आहोत.
दिल्ली उच्च न्यायालयाने तयार केलेल्या समितीची शिफारस 449 खासगी शाळांनी अमान्य केली आहे. या शाळा सतत नियमांचे उल्लंघन करत आहेत असे प्रतिज्ञापत्र  दिल्ली सरकारने न्यायालयासमोर सादर केले.