0
कोल्हापूर, दि. 16, ऑगस्ट - ‘स्वाभिमानी शेतकरी संघटने’तून हकालपट्टी केल्यानंतर कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी वेगळी चूल मांडणार असल्याचं जाहीर  केलं आहे. येत्या दसर्‍याला सदाभाऊ नव्या पक्षाबाबत घोषणा करण्याची शक्यता आहे.
शेतकर्‍यांसाठी नवी संघटना काढून आयुष्यभर शेतकर्‍यांसाठी लढत राहण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. नव्या संघटनेचं नाव मात्र सदाभाऊंनी अद्याप ठरवलेलं  नाही. राज्यभरातील शेतकर्‍यांची मतं जाणून संघटनेचं नाव ठरवलं जाणार आहे. नवीन संघटनेसाठी कार्यकर्त्यांनी नावं सुचवली असल्याचंही खोत म्हणाले. सदाभाऊ  खोत यांनी नाव न घेता राजू शेट्टींवरही जोरदार टीकास्त्र सोडलं. स्वाभिमानी शेतकरी संघटनेत काम करताना मला चक्रव्यूहात गोवल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

Post a Comment

 
Top