Breaking News

गोरखपूर मृत्यू प्रकरणी वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रशासन दोषी असल्याचा निष्कर्ष

गोरखपूर, दि. 19, ऑगस्ट - ऑक्सिजनचा पुरवठा खंडित झाल्याने गोरखपूरमधील बीआरडी वैद्यकीय महाविद्यालयात अनेक मुलांना प्राण गमवावे लागले. यासाठी  महाविद्यालयाचे प्रशासन दोषी असल्याचे इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) अहवालात नमूद करण्यात आले आहे. गुरूवारी संघटनेच्या डॉ. कुशवाह, डॉ.  अशोक अग्रवाल आणि डॉ. गुप्ता या त्रिसदस्यीय समितीने महाविद्यालयाला भेट दिली. या समितीने तपास करून गुरूवारी सांकाळी सरकारकडे अहवाल सुपूर्द केला.
10 ऑगस्टला या महाविद्यालयातील ऑक्सिजनचा पुरवठा खंडित झाला होता. पण, ऑक्सिजनचा पुरवठा करणारी संस्था - पुष्पा सेल्स यांनी थकीत बिलामुळे ही  सेवा बंद केली होती. महाविद्यालयाच्या प्रशासनाने बिल वेळेत भरले नाही. या संदर्भात वैद्यकीय महाविद्यालयाचे तत्कालीन प्राचार्य प्रा. राजीव मिश्रा आणि मेंदूच्या  आजाराच्या विभागाचे प्रभारी डॉ. काफील खान हे जबाबदार असून त्यांनी वेळेवर बिल भरण्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे मुले दगावली, असे अहवालात सप्ष्टपणे नमूद  करण्यात आले आहे.