0
पाटणा, दि. 18, ऑगस्ट - राष्ट्रगान ‘वंदे मातरम’चा अपमान केल्याप्रकरणी बिहारचे माजी उपमुखमंत्री तेजस्वी यादव यांच्याविरोधात संयुक्त जनता दलाच्या तांत्रिक  सेलचे जिल्हाध्यक्ष इक्बाल अन्सारी यांनी येथील सीजीएम न्यायालयात याचिका दाखल केली आहे. शिवाय यादव यांच्याविरोधात दरभंगा येथे तक्रारही दाखल  करण्यात आली आहे. 13 ऑगस्ट रोजी उमाशंकर सिंग नामक व्यक्तीने ‘बंदे मारते है हम’ असे ट्विट केले होते. ते ट्विट पून्हा पाठवत तेजस्वी यांनी ‘यांच्यासाठी वंदे  मातरम = बंदे मारते है हम’ असे म्हटले होते. तेजस्वी यांनी 13 ऑगस्टच्या आपल्या ट्विटमधून राष्ट्रगानाचा अपमान केला. त्यांच्या ट्विटमुळे भारतीयांच्या भावना  दुखावल्या गेल्या आहेत, असे न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेत म्हटले आहे. तेजस्वी यांच्या सह उमाशंकर सिंग यांचाही आरोपी म्हणून उल्लेख केला  आहे.
माजी उपमुख्यमंत्र्यांनी अशा प्रकारे राष्ट्रविरोधी ट्विट केल्याने त्यांना राजकीय स्वार्थापुढे देशाचा सन्मान व प्रतिमेची काळजी नसल्याचे स्पष्ट होत आहे. या ट्विटवर  चहुबाजूने टीका होऊनही तेजस्वी यांनी आपले ट्विट मागे घेतले नाही किंवा जाहीर माफीही मागितलेली नाही. त्यामुळे न्यायालयात दाद मागण्याची वेळ आल्याचे या  याचिकेत म्हटले आहे.

Post a Comment

 
Top