0

नवी दिल्ली,दि.8 : ‘एअर एशिया’ या विमान कंपनीने 1 हजार 199 रुपयांची विमान प्रवास योजना जाहीर केली आहे. यामध्ये आजपासून 10 सप्टेंबरपर्यंत पुणे, बंगळूरू, नवी दिल्ली, कोच्ची, कोलकाता, हैदराबाद या ठिकाणी जाण्यासाठी तिकिट आरक्षित करता येणार आहे. या योजनेंतर्गत आरक्षित केलेल्या तिकिटावर 28 फेब्रुवारी 2018 पर्यंत प्रवास करता येणार आहे. 1 हजार 199 रुपयांचे तिकिट हैदराबाद ते बंगळूरू, बंगळूरू ते कोच्ची, बंगळूरू ते गोवा व बंगळूरू ते हैदराबाद या मार्गांसाठी आहे. या योजनेंतर्गत बंगळूरू ते हैदराबाद दरम्यानचे तिकिट 1 हजार 199 रुपये आहे. जर एखाद्याने या योजनेंतर्गत भुवनेश्‍वर ते कोलकातापर्यंतचे तिकिट काढले, तर यासाठी 1 हजार 399 रुपये द्यावे लागतील. या योजनेंतर्गत गुवाहाटी ते इंफालच्या तिकिटासाठी 1 हजार 499 रुपये, बागडोगारा ते कोलकाताचे तिकिट 1 हजार 699 रुपये, पुणे ते बंगळूरूसाठी 1 हजार 799 रुपये, दिल्ली ते श्रीनगरसाठी 2 हजार 99 रुपये आकारले जाणार आहे. विमान कंपनीच्या संकेतस्थळानुसार, जयपूर ते हैदराबादचे तिकिट 2 हजार 299 रुपये आहे.Post a Comment

 
Top