Breaking News

महाराष्ट्र मिशन 1 मिलीयन अभियानाच्या माध्यमातून क्रीडा संस्कृतीला चालना

सांगली, दि. 16, सप्टेंबर - देशात युवकांची लोकसंख्या जास्त आहे. या युवा भारताची जडणघडण चांगली झाली, तरच समृध्द भारत निर्माण होईल. त्यासाठी  योगासने व मैदानी खेळ आवश्यक आहेत. महाराष्ट्र मिशन वन मिलीयन या उपक्रमासाठी सांगली जिल्ह्यातून 31 हजार 690 एवढी राज्यात सर्वाधिक खेळाडूंची  नोंदणी झाली आहे. या माध्यमातून क्रीडा संस्कृतीला चालना मिळाली असून भविष्यात सांगली जिल्ह्यातून चांगले खेळाडू घडतील, असा विश्‍वास पालकमंत्री सुभाष  देशमुख यांनी शुक्रवारी व्यक्त केला. 
सांगली जिल्हा क्रीडा संकुल येथे ङ्गुटबॉल ङ्गेस्टीवलच्या उदघाटनानंतर आयोजित कार्यक्रमात सुभाष देशमुख बोलत होते. या कार्यक्रमास आमदार सुधीर गाडगीळ,  सुरेश खाडे, जिल्हाधिकारी विजयकुमार काळम- पाटील, सांगली जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, सांगली जिल्हा क्रीडा अधिकारी अनिल  चोरमले, माध्यमिक शिक्षणाधिकारी महेश चोथे, सांगली जिल्हा ङ्गुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष जग्गू सय्यद, सहसचिव वसंत अग्रवाल, सचिव आतिश अग्रवाल,  राष्ट्रीय खेळाडू विजय ठाणेदार व तौङ्गिक सय्यद आदी उपस्थित होते.महाराष्ट्र मिशन वन मिलीयन या उपक्रमात सहभागी खेळाडुंना व 17 वर्षाखालील खेळाडुंसाठी  ङ्गुटबॉल विश्‍वचषक स्पर्धेच्या संघाला शुभेच्छा देऊन सुभाष देशमुख म्हणाले, की ङ्गेडरेशन ऑङ्ग इंटरनॅशनल ङ्गुटबॉल असोसिएशन (ङ्गिङ्गा) च्यावतीने दि. 6 ते 28  ऑक्टोबर या कालावधीत भारतात 17 वर्षाखालील ङ्गिङ्गा विश्‍वचषक स्पर्धा होत आहे. महाराष्ट्राला या स्पर्धेतील सामने खेळिवण्याचा बहुमान मिळाला आहे. या  पार्श्‍वभूमीवर राज्यात ङ्गुटबॉल खेळाची आवड निर्माण व्हावी व अधिकाधिक मुलांनी मैदानी खेळ खेळल्यास त्यांचे आरोग्य सुदृढ होण्यास मदत होईल, या विचाराने  राज्य शासनाने ङ्गुटबॉल मिशन, वन मिलियन कार्यक्रम जाहीर केला आहे. यात सांगली जिल्ह्यातील 421 शाळा व महाविद्यालयातील 31 हजार 690 इतक्या  विक्रमी खेळाडुंची नोंदणी झाली आहे, याबाबत त्यांनी गौरवोदगार काढले.
सुभाष देशमुख यांनी सांगली जिल्ह्यातील सर्व ङ्गुटबॉलप्रेमी खेळाडू, संघटना व शाळा- महाविद्यालयांना शुभेच्छा दिल्या व यात सहभागी खेळाडुंचे अभिनंदन केले.  सुधीर गाडगीळ व सुरेश खाडे यांनीही मार्गदर्शन करून खेळाडुंना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमात ङ्गुटबॉल संघटना पदाधिकारी व राष्ट्रीय खेळाडु यांचा सुभाष देशमुख  यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी अनिल चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली सुधाकर जमादार, शंकर भास्करे, प्रशांत पवार, अभय चव्हाण, बळवंत बाबर, श्रीमती सीमा  पाटील, सुरेश मोटे, गजानन कदम व मंदाकिनी पवार यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमास सांगली जिल्ह्यातील ङ्गुटबॉलप्रेमी, शाळा- महाविद्यालय व संघटनांचे  खेळाडू उपस्थित होते. प्रशांत पवार यांनी आभार मानले.