Breaking News

116 पॅरा टॅरोटोरियल आर्मी बटालियनचे योगेश कचरू गवळी यांचे अपघातात निधन

नाशिक, दि. 07, सप्टेंबर - लामरोडवर एसव्हीकेटी महाविद्यालयासमोर गतिरोधकावर 116 पॅरा टॅरोटोरियल आर्मी बटालियनचे योगेश कचरू गवळी (वय 33) मोटारसायकलस्वार इनोव्हा कारखाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला तर मागे बसलेली पत्नी व दोन मुली यांना गंभीर जखमी झाल्या आहे.त्यांना खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे.गवळी यांच्यावर काल रोजी लष्करी इतमामात अत्यंसंस्कार करण्यात आले. शिगवे बहुला येथील लष्करी विभागाच्या टी. ए. बटालियनमध्ये लान्स नायक पदावर असलेला योगेश कचरू गवळी (वय 33) हा दिल्ली आर्मी हेडक्वॉर्टर मध्ये कामास असून तो सुट्टीवर आलेला होता.दिनांक 5 रोजी योगेश हा पत्नीसह नाशिकरोडला देवदर्शनासाठी गेला होता.तिकडून लामरोड मार्गे परततांना रात्री 11 च्या सुमारास एसव्हीकेटी महाविद्यलयाजवळ आपल्या दुचाकीचा वेग गतिरोधक असल्याने कमी केला त्याच दरम्यान मागून भरधाव वेगात येणार्‍या इनोव्हा चक 04 -ॠउ-125 या कारने गवळी यांस धडक दिली.जबरदस्त धडकेने महिला व मुली रस्त्यावर फेकल्या गेल्या.योगेश हा स्पीड ब्रेकरवरून उडालेल्या इनोव्हा कारखाली आला व त्याचे संपूर्ण शरीर व डोक्याला मार लागल्याने त्याला स्थानिक नागरिकांनी समोरील संतकृपा हॉस्पिटल मध्ये दाखल करीत असतांनाच डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले.तर जखमी असलेल्या दोन्ही मुली व त्याच्या पत्नीला खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे.सदरचे वृत्त लष्करी विभागाला समजताच टी.ए.बटालियनच्या अधिकार्‍यांनी गवळी यांचे पार्थिव धोंडीरोड मार्गावरील लष्करी शवगृहात ठेवले सकाळी वरिष्ठ लष्करी अधिकार्‍यांच्या उपस्थितीत कायदेशीर कागदपत्रांची पूर्तता करून गवळी यांचे पार्थिव शिगवे बहुला येथे नेण्यात आले.सकाळपासूनच गावात शोकाकुल वातावरण होते.दुपारी पार्थिव गावात येताच वातावरण अधिकच भावूक झाले होते.येथील स्मशानभूमीत लष्कराच्या वतीने कर्नल सहस्रबुद्धे,कर्नल डबास,सुभेदार हवासिंग,कॅप्टन विशाल आदींनी पुष्पचक्र वाहिले.बिहार व टी.एबटालियनच्या बंदुकीच्या फैर्या झाडून सलामी देण्यात आली. तसेच कॅन्टोन्मेंट बोर्ड व देवळालीकरांच्या वतीने नगरसेवक बाबुराव मोजाड,सचिन ठाकरे आदींनी श्रद्धांजली वाहिली.श्रद्धांजली वाहतांना गावातील एक शूर लष्करी जवानाचे दुर्दैवी निधन झाल्याची खंत व्यक्त केली.त्यांच्या पश्‍च्यात आई,वडील,पत्नी दोन मुली,बहिन व छायाचित्रकार अशोक गवळी असा परिवार आहे.पोलीस उपनिरीक्षिका जी.डी.सरोदे यांनी या प्रकर निलेश साळवे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून इनोव्हा चालक विनोद प्रकाश भोईर रा.कल्याण यांस अटक करून त्याच्याविरोधात भादंवि 184,279,304 अ,327,338 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.