0
नाय पी ताउ, दि. 07, सप्टेंबर - म्यानमार दौ-यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज म्यानमार सरकारच्या प्रमुख सल्लागार आंग सान सू की यांची भेट  घेतली. या भेटीत रोहिंग्या मुस्लिमांच्या घुसखोरीबाबतची चर्चा झाली.
11 सामजस्य करारांवर यावेळी स्वाक्षर्‍या करण्यात आल्या . त्यातील एक करार सागरी क्षेत्रातील संरक्षणाबाबतचा असल्याचे समजते. उभय देशांमध्ये जहाजबांधणी  क्षेत्रातील आदानप्रदानासाठीही करार झाला. परराष्ट्र मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार 2017 ते 2020दरम्यान उभय देशातील सांस्कृतीक  आदान-प्रदानासाठीही करार करण्यात आला आहे. माहिती तंत्रज्ञान, औषध निर्मिती आदींबाबतच्या करारांवरही यावेळी स्वाक्षरी झाल्याचे समजते. मंगळवारी  पंतप्रधान मोदी यांनी म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष हतिन क्याव यांची भेट घेतली. उभय देशांमधील संबंध अधिक दृढ करण्याबाबत यावेळी त्यांच्यात चर्चा झाली. 

Post a Comment

 
Top