Breaking News

महापालिका आस्थापनेवरील 131 चतुर्थश्रेणी कर्मचार्‍यांना पदोन्नती - महापौर मिनाक्षी शिंदे

ठाणे, दि. 15, सप्टेंबर - महापालिका आस्थापनेवरील 131 चतुर्थश्रेणी कर्मचार्‍यांना लिपीक या पदावर पदोन्नती देवून निश्‍चित प्रकारे त्यांना न्याय मिळाला  असल्याची माहिती महापौर मिनाक्षी शिंदे यांनी दिली.
महापालिकेच्या आस्थापनेवर विविध विभागात चतुर्थश्रेणीत अनेक कर्मचारी कार्यरत असून, त्यांनी लिपीक या पदासाठी असलेली शैक्षणिक अर्हता धारण केली होती.  या कर्मचार्‍यांना योग्य न्याय मिळावा यासाठी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करुन आज 131 कर्मचार्‍यांना पदोन्नती आदेश बजाविण्यात आले आहेत. गेली अनेक  वर्षे हा प्रश्‍न प्रलंबित होता. याबाबत सातत्याने पाठपुरावा करुन या कर्मचार्‍यांना त्यांचा न्याय हक्क मिळाला असल्याची माहिती महापौर यांनी यावेळी दिली.
एकाच वेळी 131 चतुर्थश्रेणी कर्मचार्‍यांना पदोन्नती मिळणे ही महापालिकेच्या इतिहासातील पहिलीच घटना असल्याचेही महापौर यांनी नमूद केले आहे. आज  मिळालेल्या पदोन्नतीने चतुर्थश्रेणी कर्मचार्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण होते.
आपल्याला न्याय हक्क मिळाल्याबद्दल पदोन्नती मिळालेल्या सर्व कर्मचार्‍यांनी महापालिकेच्या सर्व पदाधिकार्‍यांचे आभार व्यक्त केले तर महापौर मिनाक्षी राजेंद्र शिंदे  हयांनी सर्व कर्मचार्‍यांना भावी काळासाठी शुभेच्छा दिल्या.