0
नवी दिल्ली, दि. 07, सप्टेंबर - सर्वोच्च न्यायालयाने आज 13 वर्षीय अल्पवयीन गर्भवतीला गर्भपात करण्याची परवानगी दिली आहे. 8 सप्टेंबर रोजी हा गर्भपात  केला जाईल . न्यायमूर्ती एस. ए. बोबडे आणि न्यायमूर्ती एल. नागेश्‍वर राव यांच्या खंडपीठाने ही परवानगी दिली आहे. 31 आठवड्यांच्या गर्भवती मुलीच्या  आरोग्याची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने एक वैद्यकीय मंडळ नेमण्याचे आदेश दिले होते .या मंडळाने मुलीची वैद्यकीय चाचणी केल्यानंतर  गर्भपातासाठी परवानगी देण्यात आली असल्याचे सांगण्यात आले.

Post a Comment

 
Top