0
वॉशिंग्टन, दि. 09, सप्टेंबर - पाकिस्तानमधील सर्वांत मोठ्या खाजगी हबिब बँकेची न्यूयॉर्कमधील शाखा बंद करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. या बँकेवर नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत न्यूयॉर्कमधील आर्थिक विभागाने बँकेला 1 हजार 400 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. अमेरिकेच्या या महत्त्वपूर्ण निर्णयाने पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे.
न्यूयॉर्कच्या आर्थिक विभागाने गेल्या महिन्यात हबिब बँकेवर 4 हजार कोटी रुपयांचा दंड लावण्याचा विचार करत असल्याचे म्हटले होते. या बँकेची अमेरिकेत एकमेव शाखा असून बँकेने ॠमनी लाँन्ड्रिंग’ विरोधी प्रकरणात नियमांचे उल्लंघन केले आहे.
या प्रकरणी हबिब बँकेच्या व्यवस्थापनाने तडजोड करण्याची तयारी दर्शवली आहे. या अंतर्गत दंडाच्या रकमेचा एक भाग भरणार असून न्यूयॉर्कमधील शाखा काही अटींच्या अधीन राहून बंद करणार असल्याचेही म्हटले आहे.

Post a Comment

 
Top