Breaking News

मराठवाड्यात सर्वदूर पाऊस , बीडला बिंदूसरेला पूर, 14 गावांचा संपर्क तुटला

औरंगाबाद, दि. 14, सप्टेंबर - गेल्या दोन दिवसात मराठवाड्यात सर्वदूर जोरदार पाऊस पडला असून शेतकरी सुखावला आहे. काल उस्मानाबाद,बीड, लातूर  जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. बिंदुसरा नदीला मोठा पूर आला असून काठावरच्या गावांना सतर्कतेच इशारा देण्यात आला आहे. या पुरामुळे 14 गावांचा संपर्क  तुटला आहे. काल रात्री औरंगाबाद, जालना परिसरातही पावसाने चांगलेच झोडपून काढले. औरंगाबादमध्ये जोरदार पावसामुळे वीज पुरवठाही खंडित झाला. आज  सकाळी 8 वा. मागील 24 तासात औरंगाबाद जिल्ह्यात सरासरी 9.68 मि.मी. पाऊसझाला आहे. तालुकानिहाय तपशील पुढीलप्रमाणे - कंसातील आकडा या  मोसमातील एकूण पावसाचा आहे. औरंगाबाद - 27.20 (393.85), फुलंब्री 2.50(404), पैठण 22.50(350.28), सिल्लोड 0.63 (469.57), सोयगाव 3.67  (320.64), कन्नड (407.89), वैजापूर 11.30(388.90), गंगापूर 4.67 (327.75), खुलताबाद 13.67(291.98). आतापर्यंत या मोसमात जिल्ह्यात एकूण  सरासरी 70.44 पाऊस झाला आहे. तो 55.19 टक्के आहे.