Breaking News

श्रीनगरमधील ग्रेनेड हल्यात 14 जण जखमी


श्रीनगर,दि.8 : श्रीनगरमध्ये झालेल्या ग्रेनेड हल्ल्यात 14 जण जखमी झाले आहेत. या हल्ल्यात एका नागरिकाचा मृत्यू झाला होता. शहरातील जहांगीर चौकात भरदिवसा हा ग्रेनेड हल्ला झाला. सैनिकांची तुकडी तैनात असलेल्या ठिकाणी हा हल्ला करण्याचा प्रयत्न झाला असून या हल्ल्यात 14 जण जखमी झाले. जखमींवर श्री महाराजा हरीसिंग रूग्णालयात उपचार सुरू आहेत.