Breaking News

राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या खजिन्यात 162 दुर्मिळ चित्रपटांची भर

पुणे, दि. 14, सप्टेंबर - राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या खजिन्यात 162 दुर्मिळ चित्रपटांची भर पडली असून यातील 125 चित्रपटाच्या ड्युप (मुळ) निगेटीव्ह  संग्रहालयाला मिळाल्या आहेत. यामध्ये 44 चित्रपट हे ब्लॅक अँड व्हाईट आहेत तर 15 चित्रपट प्रदर्शित झालेले नाहीत. याशिवाय 34 गुजराती, 15 मराठी, 2  नेपाळी आणि 6 भोजपुरी भाषेतील चित्रपटांचा समावेश असून सदरील दुर्मिळ खजिना फेमस सिनेलॅबरेटरी, मुंबई यांच्याकडून मिळाला असल्याची माहिती राष्ट्रीय  चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदुम यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. 
यावेळी नॅशनल फिल्म हेरीटेज मिशनचे संतोष अजमेरा उपस्थित होते. मगदुम म्हणाले, नॅशनल फिल्म हेरीटेज मिशन अंतर्गत सध्या सूरू असलेल्या फिलमच्या  जतानाचे काम सध्या जोरात सूरू आहे. या मिशन अंतर्गत आम्ही विविध संस्था, व्यक्तींना अवाहान केले होते त्यांच्याकडे असलेल्या दुर्मिळ फिल्म, लघुपट आम्हाला  द्यावेत त्या अवाहनाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. ब्लँक अँड व्हाईट सिनेमांच्या प्रोसेसींगवर काम करणार्‍या प्रमुख लॅबरेटरीमध्ये फेसम सिनेलॅबरेटरीचा समावेश  आहे, आम्हाला त्यांनी 162 दुर्मिळ सिनेमे दिले आहेत, त्यातील 125 सिनेमांची ड्युप निगेटीव्ह मिळाल्याने त्या सिनेमांचे जतन करणे आमच्यासाठी अधिक  अव्हानात्मक आहे, लॅबकडे असलेले सर्व चित्रपट हे अत्यंत चांगल्या स्थितीतील आहेत, यामुळे यांचे डिजिटलायजेशन करणे तुलनेने सोपे असणार आहे.
या दुर्मिळ खजिन्यात विठ्ठलभाई झव्हेरी यांच्याकडेल महात्मा’ या महात्मा गांधीवरील तब्बल सहा तासाच्या चित्रीकरणाची ड्युप निगेटीव्ह आहे. याशिवाय खजिन्यात  बॉलिवुड बादशहा अमिताभ बच्चन यांनी पदार्पण केलेल्या सात हिंदुस्तानी’, 1939 साली प्रदस्रहित झालेला सितारा’,दिलीपकुमार यांचा कोहिनूर’, पृथ्वीराज चव्हाण’  (1959), अंबर (1952), कुंवारा बाप’ (1976), मराठी सिनेमा बन्याबापू’, टोकियो ऑलंम्पिकच्या ड्युप निगेटीव्हचा समावेश आहे. याशिवाय अभिनेत्री नर्गीस  यांचा शेवटचा चित्रपट दिन और रात’, जयंत पाठारे यांची 1973 सालची आलय तुफान दर्याला’, मिठी घर’(नेपाळी) आदी चित्रपटांचा समावेश आहे. तसेच  सुर्यकांत’ आणि स्वर्ग से प्यारा घर’ या दोन चित्रपटांच्या ट्रेलरचा समावेश असल्याचे मगदुम यांनी सांगीतले.