Breaking News

कारखानदारांच्या ’मन’से रु. 175 भरपाई करार

सोलापूर, दि. 15, सप्टेंबर - कामगार भविष्य निर्वाह निधीच्या विरोधात यंत्रमाग कारखानदारांनी पाच दिवसांचा बंद पाळला होता. त्याची भरपाई म्हणून प्रती दिवस  फक्त 175 रुपये देण्याचा करार मनसेप्रणीत कामगार संघटनेशी केला. बुधवारी सहायक कामगार आयुक्त कार्यालयात याबाबत बैठक झाली होती. तीत सर्वपक्षीय  कामगार संघटना होत्या. त्यांच्या चर्चेतून तोडगा निघाला नाही. त्यामुळे कारखानदारांनी गुरुवारी मनसेला घेऊन गुपचूप करार घडवला. या कराराने प्रत्येक  कामगाराला एकूण भरपाई 875 रुपये मिळणार आहे. ही रक्कम वाढवून देण्यावर बुधवारच्या बैठकीत सर्वपक्षीय नेते आग्रही होते. मनसे संघटनेचे कार्याध्यक्ष श्रीधर  गुडेली हेही होते. कमीत कमी 300 रुपये प्रती दिवस देण्याची मागणी या वेळी झाली. परंतु कारखानदारांनी ते अमान्य केले. त्यामुळे कामगार नेत्यांनी बैठकीवर  बहिष्कार टाकून गेले होते.