0
मकाऊ, दि. 07, सप्टेंबर - आशियाई चषक पात्रता स्पर्धेच्या तिस-या फेरीत भारतीय फुटबॉल संघाने मंगळवारी मकाऊवर 2-0ने विजय मिळवला. मकाऊविरूद्ध  झालेल्या एकतर्फी सामन्यात बदली खेळाडू बलवंत सिंग याने 57व्या मिनिटाला पहिला तर 81व्या मिनिटाला दुसरा गोल करत भारताला विजय मिळवून दिला. या  विजयामुळे भारताने आशियाई कप स्पर्धेत पात्र ठरण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकले आहे. भारताचा ‘प्ले-ऑफ’ गटातील हा सलग तिसरा विजय आहे. या  आधी भारताने लाओस आणि किरगिझीस्तान संघांवर मात केली होती. सध्या भारत ‘अ’ गटात अव्वल स्थानी असून भारतात 10 ऑक्टोबरला भारताची झुंज पुन्हा  मकाऊशीच होणार आहे.

Post a Comment

 
Top