0
नवी दिल्ली, दि. 07, सप्टेंबर - कंपनी नोंदणी कार्यालयाने मान्यता रद्द केलेल्या 2 लाख 9 हजार 32 बनावट (शेल) कंपन्यांवर निर्बंध आणण्याचे निर्देश केंद्र  सरकारने बँकांना दिले आहेत. अशा मान्यता रद्द केलेल्या कंपन्यांची बँक खातीही गोठवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या संदर्भात तात्काळ पावले  उचलण्याच्या सूचना आर्थिक सेवा विभागाने इंडियन बँक्स असोसिएशनच्या माध्यमातून सर्व बँकांना दिल्या आहेत.
अशा कंपन्यांवर कारवाई करताना प्रसंगी कडक पावले उचलण्यासही सांगण्यात आले आहे. असे असले तरी कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या संकेतस्थळावर संबंधित  कंपन्या कार्यरत आहेत. मात्र त्यांनी मालमत्तेवरील सुरक्षित कर्जाशी संबंधित वार्षिक लेखा अहवाल किंवा वार्षिक विवरण पत्र सादर न केल्यास प्राथमिकदृष्ट्या दोषी  मानले जावे. कंपनी त्यांची महत्त्वपूर्ण माहिती त्यांच्या भागधारकांकडे उपलब्ध करून देण्यासाठी वैधानिक बंधनांचे पालन अनिवार्य असतानाही नियमानुसार कार्यवाही  केली जात नसल्याचेही अर्थ मंत्रालयाच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

Post a Comment

 
Top