Breaking News

न्यू लॉ कॉलेजच्या 200 हून अधिक विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेत अक्षम्य चुका

अहमदनगर, दि. 14, सप्टेंबर - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाकडून न्यू लॉ कॉलेजच्या दोनशे पेक्षा जास्त विद्यार्थ्यांच्या निकालपत्रात अक्षम्य चुका आढळल्याने  विद्यार्थ्यांनी विद्यापिठाकडे विहीत पेपर पुर्नतपासणीसाठी फॉर्म फी सहीत जमा केले असताना नियमाप्रमाणे असणार्या मुदतीत पुनर्तपासणी होवून नवीन गुणपत्रिका न  मिळाल्याने राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने पुणे विद्यापिठ अहमदनगर उपकेंद्राचे संचालक प्रा.बी.व्ही. नागवडे यांची भेट घेवून,सदर प्रश्‍न मार्गी लावण्याची मागणी  करण्यात आली.
पुढील परिक्षेचे फॉर्म भरण्याचे काम सुरु असताना त्याची मुदत 18 सप्टेंबर असून मागील वर्षीचे गुणपत्रक प्राप्त होत नसल्याने विद्यार्थ्यांना पुढील वर्षाच्या परिक्षेचे  अर्ज भरता येत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची भिती यावेळी व्यक्त करण्यात आली.तर विद्यार्थ्यांच्या पेपरची पुनर्तपासणी होवून गुणपत्रिका  तातडीने न मिळाल्यास उपकेंद्राला टाळेठोकून आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष वैभव ढाकणे समवेत  शुभम बंब,वैभव मुनोत,अंजली आव्हाड, शुभम टेमक,योगेश बाचकर,योगेश थोरात,तुषार कदम,मयुर खेळदकर,कृष्णा शिरोळे,संतोष जाधव,मंदार पळसकर आदि  उपस्थित होते.
न्यू लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी मार्च 2017 मध्ये परिक्षा दिलेली असताना सदर परिक्षेचा निकाल सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाकडून ऑनलाईन घोषित करण्यात  आले.मात्र सदरील निकालाचे निकालपत्र मिळाल्यानंतर त्या निकालात विद्यार्थ्यांच्या गुणामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आढळल्याने बहुतांश विद्यार्थ्यांनी पुणे  विद्यापिठाकडे त्यांच्या पेपरची फोटो कॉपीजची मागणी केली होती.फोटोकॉपीज मिळाल्यानंतर पेपर तपासणी करताना गुणाच्या अक्षम्य चुका आढळल्याने विद्यार्थ्यांनी  त्वरीत विद्यापिठाकडे विहीत पेपर पुनर्तपासणीसाठी फॉर्म फी सहीत जमा केले आहेत. विद्यापिठाच्या नियमाप्रमाणे असणार्या मुदतीत पुनर्तपासणी होवून गुणपत्रिका  दुरुस्त करुन देणे आवश्यक आहे.मात्र अद्याप पर्यंन्त पेपर तपासणी होवून विद्यार्थ्यांना कळविण्यात आलेले नाही.इतकेच नव्हेतर पेपरच्या फोटोकॉपीज मिळाल्यानंतर  विद्यार्थ्यांचे पेपर तपासणी न करता अंदाजेच त्यांना गुण देण्यात आल्याचे आढळले असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
लॉ कॉलेजमध्ये सुमारे 200 विद्यार्थ्यांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी पेपर पुनर्तपासणीचे फॉर्म भरलेले आहे.याबाबत अद्याप पर्यंन्त पुनर्तपासणी अहवाल आलेला नाही.असे  असताना पुणे विद्यापिठाकडून पुढील परिक्षेचे फॉर्म भरण्याचे काम सुरु होवून त्याची मुदत 18 सप्टेंबर पर्यंन्त देण्यात आली आहे.सर्व विद्यार्थ्यांचे पेपर पुनर्तपासणी  होवून आलेले नाहीत.पुढील वर्षाचे फॉर्म भरण्यासाठी मागील दिलेल्या परिक्षेचे प्रत्येक विषयात मिळालेले गुण नमुद करणे आवश्यक आहे.मात्र पुर्नतपासणीचे गुणपत्रक  न आल्याने विद्यार्थ्यांना मागील वर्षाचे गुण नमुद करता येत नसून त्यामुळे ऑनलाईन फॉर्म स्विकृत होत नाही.तसेच पुर्नतपासणीचे गुणपत्रक न आल्याने विद्यार्थ्यांना  प्रत्येक विषयाची परिक्षा फी भरावी लागत असल्याचे कॉलेज प्रशासन सांगत आहे.विद्यापिठाच्या निष्काळजीपणामुळे विद्यार्थ्यांची पिळवणूक होत असून त्यांना मानसिक  त्रास सहन करावा लागत आहे.या कारभारामुळे दोनशे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.तरी लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी पेपर  पुर्नतपासणीसाठी फॉर्म भरलेले असून त्यांच्या पेपरची तातडीने तपासणी करुन लवकरात लवकर गुणपत्रिका देण्याची कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली.