0
पुणे, दि. 15, सप्टेंबर - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने आयोजित करण्यात येणा-या महापौर चषक आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धा 2017 च्या आयोजनाबाबत  महापालिका भवनात बैठक झाली.महापौर नितीन काळजे यांच्या अध्यक्षतेखालर कार्यालयात झालेल्या या बैठकीस अतिरिक्त आयुक्त अच्युत हांगे, क्रीडा, कला,  साहित्य व सांस्कृतिक समिती सभापती लक्ष्मण सस्ते, सहाय्यक आयुक्त योगेश कडूसकर, कार्यकारी अभियंता संजय घुबे, नितीन देशमुख, क्रीडा अधिकारी रज्जाक  पानसरे, पिंपरी-चिंचवड कुस्तीगीर संघटनेचे व महेशदादा स्पोर्टस फाऊंडेशनचे पदाधिकारी, युवा महाराष्ट्र केसरी पै. किशोर नखाते, मुंबई महापौर केसरी पै. अजय  लांडगे तसेच पै.धनराज करंजवणे आदी उपस्थित होते.
महापौरचषक आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धा माहे ऑक्टोबर- 2017 मध्ये भोसरी येथील कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहा शेजारील मोकळे मैदान येथे घेण्याचे नियोजन  करण्यात आले आहे. या स्पर्धेमध्ये आंतराष्ट्रीय, देश व राज्यपातळीवरील नामांकित कुस्तीगिरांसह महाराष्ट्रातील नामांकित कुस्तीगीर सहभागी होणार आहेत. यावेळी  महापौर चषक आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धा-2017 च्या अनुषंगाने येणारा स्थापत्य, विद्युत विषयक खर्चासहित स्पर्धेचे अंदाजपत्रक तयार करणेकामी तसेच महापौर  चषक व्हॉलीबॉल, कबड्डी, क्रिकेट या स्पर्धांचे अंदाजपत्रकही संबधित संघटनेकडून मागवून घेणेकामी महापौरांनी संबंधितांना सूचना दिल्या. तसेच राष्ट्रीय स्तरावर  अर्धमॅरेथॉन स्पर्धा आयोजना कामी संबंधित संघटनेची लवकरच बैठक घेण्यात येणार असल्याचे यावेळी महापौर नितीन काळजे यांनी सांगितले.

Post a Comment

 
Top