Breaking News

आंध्र क्रिकेट संघटना आयोजित करणार टी20 स्पर्धा

नवी दिल्ली, दि. 07, सप्टेंबर - तामिळनाडू प्रिमीयर लीग स्पर्धेच्या यशानंतर ‘आयपीएल’च्या धर्तीवर आता आंध्र क्रिकेट संघटना आंध्र प्रिमीयर टी20 लीग स्पर्धेचे  आयोजन कणार आहे. राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील गुणवंत खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने खेळवण्यात येणा-या या स्पर्धेत केवळ  आंध्र प्रदेशातीलच खेळाडूंना सहभागी होता येणार आहे. आंध्र क्रिकेट संघटना आणि रेडमून क्रिएटिव्ह प्रायवेट लि. यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा आयोजित केली  जाणार आहे. या स्पर्धेत सहा संघांचा समावेश असणार असून वर्षाअखेरीस या स्पर्धेला सुरूवात होणार आहे. ही स्पर्धा जानेवारी महिन्यापर्यंत चालणार आहे.