0
नवी दिल्ली, दि. 07, सप्टेंबर - सरकारी व खाजगी क्षेत्रातील बँकांनी त्यांच्या 10 टक्के शाखांमध्ये 1 ऑक्टोबरपर्यंत आधार नोंदणी केंद्र सुरू केले नाही, तर 20  हजार रुपयांचा दंड ठोठावला जाईल, असे आधार प्राधिकरणाने जाहीर केले आहे. अशी केंद्रे सुरू करण्यास मुदतवाढ देण्याबाबत बँकांनी केलेल्या विनंतीनुसार 30  सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याचे प्राधिकरणाने म्हटले आहे.
सर्व बँकांनी आपल्या प्रत्येक शाखेत आधार नोंदणी केंद्र सुरू करण्याचे निर्देश 13 जुलै रोजी देण्यात आले होते. त्यानुसार करूर वैश्य बँकेने 17 ऑगस्ट रोजी  चेन्नईतील एका शाखेत केंद्र सुरू केले. यामुळे केंद्र सुरू करणारी करूर वैश्य बँक ही पहिली खाजगी बँक ठरली असल्याचे प्राधिकरणाकडून सांगण्यात आले.

Post a Comment

 
Top