0
नवी दिल्ली, दि. 09, सप्टेंबर - दिल्लीतील एका न्यायालयाने मांस निर्यातदारमोईन कुरेशी याला 22 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी  कुरेशीला अटक करण्यात आली होती. विशेष न्यायाधीश अरूण भारद्वाज यांनी कुरेशीच्या जामीन याचिकेवर सक्तवसुली संचालनालयाला 16 सप्टेंबरपर्यंत उत्तर  देण्याचे आदेश दिले आहेत. कुरेशीची पोलीस कोठडी आज संपली. आज त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. 

Post a Comment

 
Top