Breaking News

नाशिक महापलिका रुग्णालयात 23 इन्क्युबेटर्स वाढविण्याचा निर्णय

नाशिक, दि. 15, सप्टेंबर - नाशिक महापालिका रुग्णालयातील नवजात अर्भकांसाठी उपचार सुविधा अधिक सुसह्य करणेकामी नाशिक महापालिका आयुक्तांनी  इन्क्युबेटर्सची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये सध्या 17 इन्क्युबेटर्स आहेत. त्यात बिटको रुग्णालयात 10, कथडा येथील  डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात 4, इंदिरा गांधी रुग्णालयात 2, तर स्वामी समर्थ रुग्णालयात 1 इन्क्युबेटर आहे. आता त्यात आणखी 23 इन्क्युबेटर्स वाढविण्यात  येणार आहेत.
त्यामध्ये बिटकोत 3, झाकीर हुसेन रुग्णालयात 4, इंदिरा गांधी रुग्णालयात 6, मोरवाडी येथील रुग्णालयात 6, मायको दवाखान्यात 2, तर जिजामाता रुग्णालयात  2 इन्क्युबेटर्सची संख्या वाढविली जाणार आहे.
तसेच महापालिकेच्या रुग्णालयातून विनाकारण शासकीय रुग्णालयांमध्ये रुग्ण पाठविले जात असतील तर संबंधित वैद्यकीय अधिका-यांपासून वैद्यकीय अधीक्षकांपर्यंत  कारवाई करण्याचा स्पष्ट इशाराही आयुक्तांनी दिला आहे.