0
ठाणे, दि. 16, सप्टेंबर - भू संपादन कार्यलयातील एका लिपिक महिलेला 23 हजार रूपयांची लाच घेताना अटक करण्यात आली. 1988 मध्ये नवी मुंबईत  सिडकोच्या निर्मितीदरम्यान तक्रारदाराची जमीन भूसंपादनात गेली होती. प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र मिळावे म्हणून 2 डिसेंबर 2016 मध्ये तक्रारदाराने भूसंपादन  कार्यालयात अर्ज केला होता. मात्र, येथील महिला लिपिकाने तक्रारदाराकडून प्रमाणपत्राच्या बदल्यात 24 हजार रूपयांची लाच मागितली होती. तक्रारदाराने  यासंबंधित माहिती लाचलुचपत विभागाला दिली. विभागाने सापळा रचून त्या महिलेस लाच स्वीकारताना अटक केली. 

Post a Comment

 
Top