Breaking News

सोवळे प्रकरणाच्या निषेधार्थ मराठा क्रांती मोर्चातर्फे 25 सप्टेंबरला निषेध मोर्चा

पुणे, दि. 14, सप्टेंबर - पुण्यात मागील आठवड्यात मेधा खोले यांचे ’सोवळं मोडल्या’चं प्रकरण गाजले होते. समाजाच्या विविध स्तरातून या प्रकरणाचा निषेध  व्यक्त करण्यात आला होता. आता या निषेधांमध्ये मराठा क्रांती मोर्चा उतरला असून 25 सप्टेंबर रोजी पुण्यात निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.  याबाबतची माहिती आज पुण्यात पत्रकार परिषदेत देण्यात आली.
लाल महाल ते पोलीस आयुक्तालयादरम्यान हा मोर्चा निघणार असून यामध्ये बहुजन आणि पुरोगामी संघटनांना मोर्चात सहभागी केले जाणार आहे. मेधा खोले यांना  निलंबित करून अटक करावी अशी मागणी यावेळी करण्यात येणार आहे.