Breaking News

पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या हस्ते मच्छिमार सोसायटीला 25 लाखाचा धनादेश

मुंबई, दि. 14, सप्टेंबर - पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या हस्ते दाभोळ खाडी मच्छिमार सोसायटीला उदरनिर्वाहासाठी 25 लाखाचा धनादेश देण्यात आला.
लोटे (ता.चिपळूण) येथील औद्योगिक वसाहतीमधील सामूहिक सांडपाणी यंत्रणेद्वारे सोडल्या जाणार्‍या पाण्यामुळे मास्यांच्या उत्पादनात घट झाली होती. अनेक  ठिकाणी खाडी किनार्‍यावर मृत मासे आढळले होते. या संदर्भात मच्छिमार सोसायट्यांनी तक्रार केली होती. मंत्री श्री. कदम यांनी व्यक्तिश: लक्ष घालून सांडपाणी  प्रक्रिया यंत्रणेचे अध्यक्ष सतीश वाघ यांच्याशी चर्चा केली. त्यांनी सामाजिक बांधिलकी म्हणून 25 लाखांचा धनादेश आज मच्छिमार सोसायट्यांच्या नुकसानीपोटी  दिला.