Breaking News

ठाण्यातील 29 तलावांसाठी 31 कोटी रुपयांचा निधी मंजूर होणार

ठाणे, दि. 16, सप्टेंबर - ठाण्यातील 37 तलावांपैकी 29 तलावांचे सुशोभिकरण करण्यासाठी 31 कोटी रुपयांचा निधी खर्च करण्याचा निर्णय ठाणे महानगरपालिकेने  घेतला आहे. या योजनेसाठी 30 कोटी 88 लाख 52 हजार 480 इतका खर्च होणे अपेक्षित आहे. पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी या तलावांचा विकास  आराखडा तयार करण्यास संबंधित विभागाला आदेश दिले होते.
खर्च करण्यात येणा-या निधीमध्ये आंबेघोसाळे, खारेगाव, खर्डी, खिडकाळी, डावला, देवसर, रेवाळे, कोलशेत, शीळ, तुर्फेपाडा, देसाई, फडकेपाडा, कासारवडवली,  कळवा शिवाजीनगर, कौसा, ब्रह्माळा, कावेसर, मुंबे्रश्‍वर, दातिवली, नार, डायघर, दिवा, जोगिला, बाळकुम, गोकूळनगर, रायलादेवी, ओवळा, आगासन या 29 तलाव  आणि परिसराचा कायापालट होणार आहे. या ठिकाणी तलावाच्या परिसरात तलावाभोवती विद्युत दिवे बसवणे, मध्यभागी कारंजा, लॉन बसवणे, छोटीमोठी झाडे  लावून परिसराचे सुशोभीकरण, स्त्री व पुरुषांकरिता स्वतंत्र शौचालये, आवश्यकतेनुसार ऑनलाईन मॉनिटरिंग साहित्य बसवणे, जेटिंग मशीनच्या साहाय्याने जॉगिंग  ट्रॅकची साफसफाई करणे आदी कामे केली जाणार आहेत.