0
नाशिक, दि. 06, सप्टेंबर - जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागा मार्फत दिव्यांगाना स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी तीन ते चार टक्के निधी राखीव असतो  यात जवळपास 34 योजनाचा समावेश असून, दिव्यागणी या योजनाचा लाभ घ्यावा,असे आवाहन हरसूल गटाच्या जि.प सदस्य रुपांजली माळेकर यांनी केले आहे.  शासन दरबारी विविध योजना राबविल्या जातात..परंतु या योजनांची माहिती लाभार्थ्या पर्यत पोहचवली जात नाही किवा पोहचण्यास कुचकामी होऊन शासन दरबारी  तशाच पडून असतात.दिव्यागासाठी असलेल्या विविध योजनाचे प्रस्ताव पंचायत समिती स्तरावरून पाठविले जातात.या योजना मध्ये अस्थि दिव्यागासाठी कलीपरस,  तीन चाकी सायकल, स्वयंचलित तीन चाकी सायकली, कृत्रिम अवयव, कुबड्या, वॉकर, सर्जिकल फुटवेअर, मोबिलिटी, कमोड चेअर (खुर्ची), कमोड, नील वाकी  ब्रेस, डिव्हाईसेस फॉर लीव्हिग आदी साहित्याचा समावेश आहे. अंध व्यक्तीसाठी मोबाईल,लपटोप,नोट वेअर,संगणक,बेल,लेखन साहित्य,टाईपरायटर,लार्ज प्रिंट  बुक,अल्प दृष्टी अपंगावर मात करण्यासाठी डिजिटल माग्नीफायर सह,सह्ह्याभूत साधने व उपकरणे दिली जातात.बहुविकलांग व्यक्तीसाठी सीपी वेअर,स्वयचलित  सायकल व खुर्ची, संगणक वापराचे सहाय्यभूत उपकरणे,संबधित क्षेत्रातील तज्ञांनी केलेले सहायभूत उपकरणे व साधनाचा समावेश आहे टर मतीमंद व्यक्तीसाठी  साहित्य संच,बुद्ठीमत्ता चाचणी संच,सहाय्यभूत उपकरणे,साधने तसेच तज्ञांनी शिफारस केलेले सहाय्यभूत उपकरणे दिली जातात.तर वेगवेगळ्या प्रकारच्या  विव्यागासाठीच्या सुमारे 34 योजना असून या योजनाचा लाभ दिव्याग व्यक्तींनी करून घ्यावा असे आवाहन जि.प. सदस्य रुपांजली माळेकर यांनी केले आहे. 

Post a Comment

 
Top