Breaking News

लायन्स क्लबने केले 42 टन निर्माल्य संकलन

पुणे, दि. 07, सप्टेंबर - लायन्स क्लब ऑफ इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 2334 डी 2 तर्फे गणेश विसर्जनादरम्यान ‘निर्माल्य दान’ उपक्रम राबविण्यात आला. या  उपक्रमाअंतर्गत यंदा गणपती बाप्पांच्या विसर्जनादिवशी शहरातील विविध घाटांवर 42 टन निर्माल्याचे संकलनकरण्यात आले. लायन्स क्लबच्या 52 क्लबमधून  जवळपास एक हजार सभासद सहभागी झाले होते. या उपक्रमाचा शुभारंभ सकाळी 9.30 वाजता निलायम टॉकीजजवळील घाटावर लायन्स क्लबचे प्रांतपाल गिरीश  मालपाणी यांच्या हस्ते झाला.याप्रसंगी लायन्स क्लबचे उपप्रांतपाल रमेश शहा, उपक्रमाचे प्रमुख विजय बढे, संयोजक आनंद आंबेकर, प्रसाद खंडागळे, मुकुंद खैरे,  प्रवीण ढोरे. डॉ. सतीश देसाई, डॉ. मिलिंद भोई, शिरीष मोहिते यांच्यासह लायन्सचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.2003 पासूनविसर्जनादरम्यान हा उपक्रम  राबविण्यात येतो. नदी पात्रात पडणारे निर्माल्य रोखण्याचे व गोळा करण्याचे आवाहन गणेशभक्तांना करण्यात आले.पुण्यातील 22 घाटांवर, तर पिंपरीतील 7 घाटांवर  लायन्स क्लबचे पदाधिकारी आणि सभासदांनीनिर्माल्य संकलन केले.दोन्हीही पालिकांच्या क्षेत्रीय कार्यालयांचे व वॉर्ड ऑफिसच्या अधिकार्‍यांचे व कर्मचार्‍यांचे विसर्जन  घाटांवर चांगले सहकार्य लाभले.संकलन केलेले हे निर्माल्य पालिकेकडे खतनिर्मितीसाठी सुपूर्त केले असून, या निर्माल्य संकलनामुळे मोठ्या प्रमाणात होणारे नदी  प्रदूषण रोखण्यात यश आले आहे, असे उपक्रमाचे प्रमुख विजय बढे म्हणाले.