Breaking News

फिनिक्सच्या शिबीरात 490 रुग्णांची तपासणी

अहमदनगर, दि. 16, सप्टेंबर - मोफत आरोग्य शिबिर म्हटल कि रुग्ण पाठ फिरवित असत कारण शिबिरात शस्त्रक्रिया चांगल्या होत नाहीत अशी भिती वाटायची पण सध्या नगर शहर, उपनगरात, ग्रामीण भागात सध्या सेवा-भावी संस्थांनी मोफत आरोग्य तपासणी, नेत्र तपासणी, मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिरे घेवून हजारो रुग्णांना दृष्टी देऊन मोफत शिबिरात चांगले काम होत असल्याचे सिद्ध केले. असे प्रतिपादन जालींदर बोरुडे यांनी केले.
फिनिक्स फाऊंडेशनच्यावतीने नागरदेवळे येथे मोफत मधुमेह, रक्तदाब व आरोग्य तपासणी,  नेत्र तपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबीराचे उद्घाटन ह.भ.प. गोकुळ देवतरसे महाराज  यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ह.भ.प. गोकुळ देवतरसे महाराज म्हणाले कि,   सध्या नेत्र चळवळ म्हणून मोफत आरोग्य तपासणी व नेत्र तपासणी शिबीरे घेवुन फिनिक्स फाऊंडेशने सामाजिक बांधिलकीतुन गोरगरीब, वंचित, दुबळ्या घटकांनासाठी शिबीरांच्या माध्यतुन मानव सेवा हिच ईश्‍वर सेवा आहे असे दाखवुन दिले आहे. खरोखरच त्यांचे हे कार्य प्रेरणादायी असल्याचे देवतरसे महाराज यांनी सांगितले.
या शिबिरात 490 रुग्णांनी तपासणी होऊन 73 रुग्ण शस्त्रक्रिये साठी निवडले असल्याचे फाऊंडेशनच्यावतीने  अय्युब पठाण यांनी सांगितले., यावेळी फाऊंडेशनचे सर्व कार्यकर्ते व परिसरातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.     हे शिबीर यशस्वीतेसाठी  अकाश धाडगे, गौरव बोरुडे, अक्षय गाडेकर, गोकुळ गिलचे, सौरभ बोरुडे, रतन तुपविहिरे, यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सौरभ बोरुडे यांनी केले.तर आभार सुमित मेहरे यांनी मानले.