Breaking News

पुण्यात क्रेनची 4 वाहनांना धडक, सायकलस्वार वृद्धाचा जागीच मृत्यू


पिंपरी ,दि.8 : क्रेनची 4 वाहनांना जोरदार धडक बसून यात सायकलस्वार वृद्धाचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना किवळे परिसरात घडली. निवृत्ती सुतार असे मृत व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवडमधील किवळे परिसरात क्रेनने (चक14 च् 373) रस्त्यावरील 4 गाड्यांना जोरदार धडक दिली. क्रेनचे ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाला. या अपघातात चारही गाड्यांचे मोठे नुकसात झाले आहे. देहूरोड पोलिसांनी क्रेन चालकाला ताब्यात घेतले आहे.देहुरोड विकासनगर चौकात क्रेनच्या धडकेत गंभीर जखमी झालेले निवृत्ती सुतार यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. परंतु उपचार सुरु असताना त्यांची प्राणज्योत मालवली.