0
मुंबई, दि. 07, सप्टेंबर - जुहू येथील प्रार्थना या 13 मजली बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागली. आगीत 6  जणांचा मृत्यु झाला असून 12 जण जखमी झाले आहेत. जखमींवर कूपर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. जखमींमध्ये दोन महिलांचाही समावेश आहे. जखमींमधील  4 जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षातून देण्यात आली. आगीची माहिती मिळताच पोलीस व अग्निशमन दलाच्या  जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळे ही आग लागली असल्याचे सांगण्यात येत आहे. तेथे असलेल्या लाकडी आणि  भंगाराच्या साहित्यामुळे आग भडकली. घटनास्थळी पोहोचलेल्या अग्निशमन दलाने मध्यरात्रीच्या सुमारास आगीवर ताबा मिळवला.

Post a Comment

 
Top