Breaking News

नवी मुंबईत 7 हजार 577 श्रीगणेशमूर्तींना भावपूर्ण निरोप

नवी मुंबई, दि. 07, सप्टेंबर - नवी मुंबईत अनंतचतुर्दशीदिनी 7 हजार 577 श्रीगणेशमूर्तींना भावपूर्ण निरोप देण्यात आला. नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत सर्व 23 विसर्जन स्थळांवर करण्यात आलेल्या उत्तम व्यवस्थेमुळे विघ्नहर्त्या श्रीगणरायाचा विसर्जनसोहळा अनंतचतुर्दशीदिनी निर्विघ्नपणे संपन्न झाला. महापालिका क्षेत्रात एकुण 513 सार्वजनिक व 7 हजार 64 घरगुती अशा एकूण 7 हजार 577 श्रीगणेशमुर्तींचे विसर्जन उत्साहात संपन्न झाले. 
बेलापूर विभागत 5 विसर्जन स्थळांवर 1117 घरगुती व 50 सार्वजनिक, नेरुळ विभागात 2 विसर्जन स्थळांवर 49 घरगुती व 1113 सार्वजनिक, वाशी विभागात 3 विसर्जन स्थळांवर 901 घरगुती व 80 सार्वजनिक, तुर्भे विभागात 2 विसर्जन स्थळांवर 572 व 36 सार्वजनिक, कोपरखैरणे विभागात 3 विसर्जन स्थळांवर 1061 घरगुती व 102 सार्वजनिक, घणसोली विभागात 4 विसर्जन स्थळांवर 1111 घरगुती व 100 सार्वजनिक, ऐरोली विभागात 3 विसर्जन स्थळांवर 635 घरगुती व 23 सार्वजनिक, दिघा विभागात 1 विसर्जन स्थळांवर 554 घरगुती व 73 सार्वजनिक अशाप्रकारे एकुण 23 विसर्जन स्थळांवर 7064 घरगुती व 513 सार्वजनिक अशा 7577 श्रीगणेशमुर्तींचे विसर्जन संपन्न झाले. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीविर्षीप्रमाणे याही वर्षी वाशी येथील मध्यवर्ती छत्रपती शिवाजी महाराज चौकात भव्यतम व्यासपीठावरून विसर्जनस्थळाकडे प्रस्थान करणा-या श्रीगणेशमुर्तींवर महापौर . सुधाकर सोनवणे, बेलापूर विधानसभा सदस्य मंदाताई म्हात्रे, महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन., पोलीस आयुक्त हेमंत नगराळे आणि इतर मान्यवरांच्या हस्ते पुष्पवृष्टी करण्यात आली.