0
मुंबई, दि. 15, सप्टेंबर - राज्य सरकारच्या शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत आणखी सात दिवसांनी वाढवली गेली आहे .कर्जमुक्ती  योजनेसाठी अर्ज दाखल करण्याची उद्या 15 सप्टेंबर रोजी अंतिम मुदत आहे . आज अखेर 50 लाख शेतकर्‍यांनी या योजनेसाठी अर्ज दाखल केले आहेत. आणखी  39 लाख शेतकर्‍यांनी अद्यापि या योजनेसाठी अर्ज दाखल केलेले नाहीत . उद्या अखेरच्या दिवशी एवढ्या शेतकर्‍यांचे अर्ज सादर होणे शक्यच नाही याची कल्पना  आल्याने सरकारने हा निर्णय घेतल्याचे सरकारी सूत्रांनी सांगितले.
भारनियमनामुळे या योजनेचे ऑनलाईन अर्ज दाखल करण्यात अडथळे येत असल्याच्या तक्रारी संपूर्ण राज्यभरातून करण्यात येत होत्या . त्यामुळेच ही मुदत वाढवली  गेली आहे .

Post a Comment

 
Top