Breaking News

शक्तीपुंज एक्सप्रेसचे 7 डबे रुळावरून घसरले

लखनौ, दि. 07, सप्टेंबर - उत्तर प्रदेशमधील सोमभद्र येथे आज सकाळी सातच्या सुमारास शक्तीपुंज एक्सप्रेसचे 7 डबे रुळांवरुन घसरले. घटनेची माहिती  मिळताच तत्काळ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. ही एक्सप्रेस हावड्यावरुन जबलपूरला चालली होती . एक्सप्रेसचा वेग कमी असल्यामुळे कोणतीही जीवितहानी  झालेली नाही. उत्तर प्रदेशात महिन्याभरात झालेला हा तिसरा रेल्वे अपघात आहे.
आजमगढहून दिल्लीला चाललेल्या कैफियत एक्सप्रेसचे 23 ऑगस्ट रोजी दहा डबे घसरले होते. या अपघातात 74 प्रवासी जखमी झाले होते.