0
पुणे, दि. 15, सप्टेंबर - पुणे-मुंबई एक्सप्रेस वे वर झालेल्या अपघातात एक जण ठार तर सात जण जखमी झाले आहेत. पुण्याच्या दिशेने भरधाव वेगात निघालेली  झायलो कारच्या चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्यामुळे देवले पुलाजवळील ओढ्याच्या कठड्याला धडकून हा अपघात झाला. आज सकाळी साडे सहा वाजता हा  अपघात झाला.
देबशीश लेहरी (वय 20 वर्षे रा.डांगे चौक थेरगाव) असे या अपघातात मृत झालेल्याचे नाव आहे. इशान चत्तुरवेदी (वय 20) आयुष काशीद (वय 23), विशाल  प्रजापत (वय 21), विपुल पाटीदार (वय 22 सर्व रा.थेरगाव) हे किरकोळ जखमी झाले असून गंभीर जखमी झालेल्या तिघांची नावे अद्याप समजू शकली नाहीत.  त्यांच्यावर निगडी येथील लोकमान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.खंडाळा महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी मुंबईहून पुण्याच्या दिशेने  भरधाव वेगात निघालेली झायलो मोटार (एमएच 14 सीएक्स 2003) च्या चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने ही गाडी सुरक्षा रोप व लोखंडी अँगलच्या  कठड्यावर आदळून रस्त्याच्या खाली जाऊन आदळली. 

Post a Comment

 
Top