Breaking News

गुरूग्राममधील शाळेच्या शौचालयात 7 वर्षीय मुलाची गळा चिरुन हत्या

गुरुग्राम, दि. 09, सप्टेंबर - गुरुग्राममधील एका शाळेतील शौचालयात 7 वर्षीय मुलाची गळा चिरुन हत्या करण्यात आली. त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. 
आज सकाळी तो शाळेत गेला होता. काही वेळानंतर शाळेतून दुरध्वनी आला की त्याची प्रकृती ठीक नाही. त्यामुळे त्याला घेण्यासाठी मी शाळेत गेलो. मात्र त्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता, असे मृत मुलाच्या वडिलांनी सांगितले.