0
मेक्सिको, दि. 09, सप्टेंबर - मेक्सिको शहरातील पिजीजियापन येथे समुद्रकिनार्‍याजवळ भूकंपाचा तीव्र धक्का जाणवला. हा धक्का 8.0 रिश्टर स्केल तीव्रतेचा असून यात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन लहान मुलांचा समावेश आहे. भूकंपामुळेात त्सुनामी येण्याचा इशारा आठ देशांना देण्यात आला आहे. यामध्ये मेक्सिकोसह ग्वाटेमाला, एल सल्वारप , कोर्टारिका, निकारागुआ, पनामा, होन्डुरास आणि इक्वाडोर यांचा समावेश आहे.
भूकंपाचा तीव्रता जास्त असल्यामुळे येथील जमिनीला तडे गेले असल्याचे सांगण्यात येत आहे. पिजीजियापनपासून 123 किलोमीटर अंतरावर भूकंपाचा केंद्रबिंदू आहे. मेक्सिकोमध्ये झालेला भूकंप हा 1985 नंतरचा मोठा भूकंप आहे.

Post a Comment

 
Top